फसवणूक प्रकरणात एक संशयिताला कोठडी, तर एक बेपत्ता

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ डिसेंबर २०२१ । पाराेळा येथील संजय मोहनलाल शर्मा यांची पाच लाख रुपयांत फसवणूक झाल्याचे प्रकरण ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आले होते. ही फसवणूक डेनिम हब लाइफ स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फ्रॅन्चायझी देत सांगून केली होती. अखेर त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केले असता. २८ डिसेंमबर पोर्यंत पोलीस कोठली सुनावली आहे.

सविस्तर असे की, डेनिम हब लाइफ स्टाइल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची फ्रॅन्चायझी देत असल्याचे भासवून पाराेळा येथील संजय मोहनलाल शर्मा यांची पाच लाख रुपयांत फसवणूक झाल्याचे प्रकरण ऑक्टोबर महिन्यात उघडकीस आले होते. या प्रकरणी सायबर पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संबंधित भामट्यांनी राज्यभरातील नऊ जणांची २९ लाखांत फसवणूक केल्याचे समोर आले. यातील साईराम बालाजी पाटील (वय २८, रा. हैदराबाद) याला पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयात हजर केले असताना त्याला २८ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे ऍड प्रिया मेढे यांनी काम पाहिले. या गुन्ह्यात परमेश बालाजी पाटील हा अद्याप बेपत्ता आहे. त्याचा शोध पोलिसांकडून घेतला जाताे आहे.

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -