सोमवार, डिसेंबर 11, 2023

फक्त एका रुपयात मिळणार झाडाचे रोप ! कसे? वाचा सविस्तर

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जुलै २०२२ । वन विभागातर्फे १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत वनमहोत्सव राबवण्यात येणार आहे. शाळा व महाविद्यालयांना सवलतीच्या दरात केवळ एक रुपये प्रती रोप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. वृक्षप्रेमी नागरिक, शेतकऱ्यांना वर्गीकरणानुसार १० ते ६५ रुपयांपर्यंत रोपे मिळणार आहेत.

पाऊस लांबल्याने वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला नाही. वनविभागाच्या नर्सरीत वृक्ष लागवडीसाठी १० लाख रोपे तयार केली आहेत.

ज्या शासकीय यंत्रणा, स्थानिक स्वराज्य संस्थांकडे रोप निर्मितीसाठी आर्थिक तरतूद नाही. त्यांना वनमहोत्सव कालावधीत रोपांचा मोफत पुरवठा करण्यात येणार आहे. शासकीय संस्था, शासकीय जागाधारक यांनी रोपे लागवडीसाठी निधी उपलब्ध नाही. त्यांना तसे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. त्यांना प्रति हेक्टर १ हजार या मर्यादेत रोपांचा पुरवठा करण्यात येणार आहे. जळगाव उपविभागात ३०० ठिकाणे निश्चित केली आहेत. नागरिकांना मागणीनुसार नर्सरींमधून रोपे देण्यात येत आहेत. पाऊस पडल्यानंतर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात येईल. सवलतीचा फायदा घ्यावा, असे उपवनसंरक्षक विवेक होशिंग यांनी केले आहे.