fbpx

प्रांताधिकारी विनय गोसावी यांचा अवैध गौनखनिज वाहतूक तपासणी दौरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज ।०१ एप्रिल २०२१ । एरंडोल तालुक्यात लॉकडाऊन दरम्यान कोणाचेही लक्ष आपल्या कडे नाही. या गैरसमजातून अवैध गौण खनिज वाहतूक करणारे बिनदिक्कत आपले काम करीत होते. तसेच तालुक्यात सध्या जोरदार अवैध गौण खनिज वाहतूक करुन चढ्या भावाने विक्री होत आहे.अशा परिस्थितीत प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी अचानक अवैध गौण खनिज वाहतूक तपासणी मोहीम राबविली.

यावेळी त्यांनी तालुक्यात हनुमंतखेडेसिम येथील गिरणा  पात्रात ही मोहीम राबविली.याठिकाणी नेहमी मोठ्याप्रमाणात अवैध वाळू ची चोरटी वाहतूक केली जाते.

यावेळी त्यांच्या सोबत किशोर माळी मंडळ अधिकारी उत्राण,विनायक मानकुम्बरे मंडळ अधिकारी एरंडोल,भरत पारधी तलाठी पथक आदी कर्मचारी उपस्थित होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज