प्रवाशांनो लक्ष द्या : या लांबपल्ल्याच्या गाड्या झाल्या आहेत रद्द

जळगाव लाईव्ह न्यूज : ११ मार्च २०२३ : मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील मनमाड-दौंड विभागातील बेलापूर, चितळी, पुणतांबा दुहेरी लाईन यार्डच्या रीमोल्डिंग कामांमुळे बुधवार, 22 व गुरुवार, 23 मार्चला ब्लॉक घेण्यात आल्याने या मार्गावरील 10 रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

तर 12 गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला असून अन्य चार गाड्यांच्या वेळादेखील बदलल्या आहेत. दरम्यान, सोलापूर विभागात घेण्यात येणार्‍या ब्लॉकचा फटका प्रवासी रेल्वे गाड्यांना बसणार असल्याने प्रवासीवर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ऐन सणात गाड्या रद्द केल्याने प्रवाशांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.

या गाड्या झाल्या रद्द
गाडी क्रमांक 17630 नांदेड-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 21 व 22 दोन दिवस गाडी रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक 17629 पुणे-नांदेड एक्सप्रेस 22 व 23 मार्चला सुटणारी गाडी रद्द केली आहे.12135 पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 23 मार्चला पुण्यातून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

गाडी 11039 कोल्हापूर-गोंदिया महाराष्ट्र एक्सप्रेस ही गाडी 21 व 22 या दिवशी कोल्हापूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे. तर11040 गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस 22 व 23 मार्च रोजी रद्द करण्यात आली आहे.

11041 दादर-साई नगर शिर्डी एक्स्प्रेस 21 व 22 मार्चला तर 11042 साईनगर शिर्डी-दादर ही 22 व 23 मार्च रोजी गोंदियाहून सुटणारी दादर एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 12114 नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 21 मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.

12113 पुणे-नागपूर एक्स्प्रेस ही गाडी 22 मार्च रोजी पुण्याहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली असून 12136 नागपूर-पुणे एक्स्प्रेस ही गाडी 22 मार्च रोजी नागपूरहून सुटणारी गाडी रद्द करण्यात आली आहे.