⁠ 
गुरूवार, सप्टेंबर 19, 2024
Home | बातम्या | पोलीसांनी एका दिवसात १७० तक्रारींचे केले निरसन

पोलीसांनी एका दिवसात १७० तक्रारींचे केले निरसन

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ जून २०२३ ।  भुसावळ पोलीसांनी एका दिवसात १७० तक्रारींचे निरसन केले. डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि तालुका पोलीस ठाण्यात शनिवारी तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले. भुसावळ तालुका ठाण्यात 90 पैकी 70 तर शहर पोलीस ठाण्यात 145 पैकी 104 अर्जांचा निपटारा करण्यात आला.

शहरासह ग्रामीण भागात झालेल्या वादाबद्दल पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रार अर्जावर कार्यवाही करण्यासाठी शनिवारी तालुका पोलिस ठाणे आणि शहर पोलिस ठाणे या दोन पोलिस ठाण्यात तक्रार निवारण दिनाचे नियोजन केले होते. तालुका पोलिस ठाण्यात 90 अर्ज तक्रारींचे होते, त्यातील 70 अर्ज निकाली निघाले आहे. दोन्ही बाजूकडील लोकांना बोलावून त्यांचे म्हणणे ऐकून त्यांना समज देऊन त्यांच्या वादाचे प्रकरण मिटविले.

यावेळी डीवायएसपी कृष्णात पिंगळे, परीवेक्षाधीन डीवायएसपी सतीश कुळकर्णी, सहायक निरीक्षक अमोल पवार यांच्यासह अन्य अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अर्जदार सकाळी नऊ वाजेपासून पोलीस ठाण्यात आले होते. अर्जदारांचे समाधान झाले, त्यांना न्याय मिळाला असल्याचे सतीश कुळकर्णी यांनी सांगितले.

भुसावळ शहर पोलीस ठाण्याचा तक्रार निवारण दिनाचा कार्यक्रम येथील पंचायत समिती सभागृहात झाला. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत तक्रार निवारण दिनात अर्जदार सामील झाले. शहर पोलीस ठाण्यातील 145 अर्जांपैकी 104 अर्जावर चर्चा झाली.

यात पाच अर्जात चॅप्टर केस करण्यात आली तर तीन अर्जात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आली. पोलीस निरीक्षक गजानन पडघण, सहायक निरीक्षक अनिल मोरे, सहायक निरीक्षक निलेश गायकवाड, उपनिरीक्षक अंबादास पाथरवट, उपनिरीक्षक संजय कंखरे, उपनिरीक्षक दिलीप चौधरी, आशा तडवी आदी उपस्थित होते.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह