fbpx

पळासखेडे येथील तरूणाची गळफास घेऊन आत्महत्या

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२१ । पारोळा तालुक्यातील पळासखेडे सिम येथील एका ३० वर्षीय तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याही घटना घडली.  दिपक अशोक पाटील (३०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

याबाबत अधिक असे कि,  दिपक पाटील यांनी रात्री आपल्या परिवारा सोबत केले. त्यानंतर बाहेरून फिरून येतो असे सांगत बाहेर गेला. तर रात्री उशिरापर्यंत परत आलाच नाही म्हणून घरच्या नी शोधा शोध सुरू केली. तर सकाळी महस्वे शिवारात  दोरीच्या सहाय्याने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचे आढळुन आले.  दीपक याला पारोळा कुटीर रूग्णालयात दाखल केले असता त्याला डाॅक्टरांनी तपासुन मृत घोषित केले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज