नागरिकांनो सप्टेंबर महिन्यात तब्बल ‘इतके’ दिवस बँकांना सुट्टी

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | २९ ऑगस्ट २०२१ । ऑगस्ट महिन्याप्रमाणे सप्टेंबर महिन्यात देखील बँकांना मोठ्या प्रमाणावर सुट्या मिळणार आहेत. ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये अनेक सण आल्याने बँकांना मोठ्या प्रमाणावर आहेत. नागरिकांना अडचण होणार नाही यासाठी रिझर्व बँक तर्फे सुट्ट्यांची यादी आधीच जाहीर करण्यात आली आहे.

या तारखांना असणार बँकांना सुट्टी
महाराष्ट्रात ५,१०,११,१२,१९,२५ आणि २६ रोजी बँका बंद राहणार आहेत. दहा तारखेला गणेश चतुर्थी आहे त्यानंतर रविवार आणि शनिवार आल्यामुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार आहेत. याच बरोबर २५ आणि २६ तारखेला चौथा शनिवार रविवार असल्याने पुन्हा एकदा सलग दोन दिवस बँका बंद राहणार आहेत.

व्यावसायिकांचा खोळंबा
बँका बंद राहिल्याकी सहाजिकच सर्वसामान्य व्यावसायिकांचा खोळंबा होतोच. कारण बँकेमध्ये आलेली मुद्दल टाकणं ही सर्वसामान्य व्यवसायिकांची दिनचर्या आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar