जळगाव लाईव्ह न्युज । २२ एप्रिल २०२२ । जळगाव जिल्ह्यात आज पर्यंत मी कित्येकदा आलो आहे. जळगाव जिल्हा हा आधी पासूनच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला राहिला आहे. नागपूर सोबत जर कोणता जिल्हा भारतीय जनता पक्षाला सोबत नेहमीच एक जुटीने उभा राहिला आहे तो म्हणजे जळगाव जिल्हा. जळगाव जिल्ह्याचे नागरिक भारतीय जनता पक्षाला सोबत उभे आहेत. असे नितीन गडकरी कार्यकर्त्यांशी बोलताना म्हणाले.
नितीन गडकरी शुक्रवारी जळगाव जिल्हा दौर्यावर आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नितीन गडकरी आणि कार्यकर्त्यांच्या संवादासाठी परिवार संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
यावेळी ते असेही म्हणले की, भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. या पक्षामध्ये कधीही कोणतीही घराणेशाही चालली नाही. आजवर कोणीही या पक्षावर राज्य करू शकलं नाही कारण की हा पक्ष कार्यकर्त्यां मुळेच बनलाय आणि कार्यकर्ते हेच या पक्षावर अंकुश ठेवतात असे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्ता संवादांमध्ये म्हणाले.
डसे