नगरसेवकाच्या घरी भरली बैलांची जत्रा, कोरोना नियम फाट्यावर

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्युज | ६ सप्टेंबर २०२१| जळगाव महानगरपालिकेतील शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी कोरूना चे सर्वे नियम धाब्यावर बसवत आपल्या कार्यकर्त्यांसह बैल पोळा साजरा केला. जर लोकप्रतिनिधीच अशाप्रकारे कोरोना नियमांचे उल्लंघन करत असतील तर नागरिकांनी नक्की आदर्श तरी कोणाचा घ्यावा असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

 

कोरोना चा प्रादुर्भाव जरी कमी होत असला तरी तिसऱ्या लाटेची चिंता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आहे म्हणून येत्या काळात कोणीही गर्दी करू नये असे कळकळीची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नेत्यांना आणि नागरिकांना केली आहे. मात्र जळगाव शहरातील शिवसेनेचे नगरसेवक प्रशांत नाईक यांनी मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला केराची टोपली दाखवली आहे.

कोरोना चे सगळे नियम धाब्यावर बसवत प्रशांत नाईक यांनी गर्दी करत स्वतःच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर नाचत सोशल डिस्टंसिंग आणि मार्चच्या वापराला फाट्यावर मारत बैलपोळा साजरा केला. प्रशांत नाईक यांनी साजरा केलेल्या या बैलपोळा बाबत नागरिक उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -