जळगाव लाईव्ह न्यूज । २० जून २०२२ । एका २२ वर्षीय तरुणाचा रेल्वे लाइनवर मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना तारखेडे रोडजवळील रेल्वे लाइनवर उघडीस आलीय. जयवंत चौधरी (वय २२) असे मृत तरुणांचे नाव आहे.
एरंडाेल तालुक्यातील उत्राण अहिर हद्द येथील रहिवासी असलेला हा तरुण दि. १८ रोजी सकाळी नेहमीप्रमाणे गावातील कंपनीत कामाला गेला होता. सायंकाळी तो घरी न परतल्याने कुटुंबियांनी त्याचा शोध घेतला. त्यावेळी ही घटना उघड झाली. या घटनेमागील कारण स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पाचोरा येथील रेल्वे पोलिस करत आहेत.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज