दूध संघाच्या स्वीकृत संचालक पदी स्मिता वाघ यांची नियुक्ती

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२३ । माजी आमदार स्मिता वाघ तसेच रमेश पाटील जळकेकर यांची यांची निवड जळगाव दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या स्वीकृत संचालक पदी करण्यात आली आहे. रमेश पाटील हे मंत्री गुलाबराव पाटील यांचे विश्वासू सहकारी मानले जातात. (smita wagh and ramesh patil)

दूध संघाची मासिक सभा १० रोजी चेअरमन आमदार मंगेश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, ना. गुलाबराव पाटील, आमदार चिमणराव पाटील, आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार स्मिता वाघ व रमेश पाटील जळकेकर यांची स्वीकृत संचालकपदी निवड करण्यात आली. (mangesh chauvhan gulabrao patil chimanrao patil sanjay sawkare,)