दुचाकी वाहनांसाठी नवीन पसंती क्रमांक मालिका सुरु

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज ।  २३ ऑगस्ट २०२१।  उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात परिवहनेत्तर संवर्गातील दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी एमएच 19-सीपी-0001 ते 9999 पर्यंतची मालिका लवकरच सुरु करण्यात येत आहे.

ज्या वाहनधारकांना आपल्या वाहनांसाठी आकर्षक व पसंतीचा क्रमांक हवा असेल त्यांनी दि. 25 ऑगस्ट, 2021 रोजी दुपारी चार वाजेपर्यंत अर्ज करावेत. या अर्जासोबत शासकीय शुल्काचा धनादेश उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांच्या नावे द्यावा. शुल्क भरल्यावर 30 दिवसांच्या आत वाहन नोंदणी न केल्यास भरलेले शुल्क हस्तांतरीत होणार नाही. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा

असे आवाहन श्याम लोही, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, जळगाव यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -