दुःखद बातमी : आमदारांच्या स्वीय सहाय्यकाचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । अमळनेर तालुक्यातील मारवड येथील रहिवासी तथा अमळनेरचे आमदार अनिलदादा पाटील यांचे स्वीय सहाय्यक ज्ञानेश्वर कुमावत (वय ४६) यांचे आज सोमवार दि.१२ डिसेंबर रोजी हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंतयात्रा त्यांच्या मुळगावी मारवाड येथील राहत्या घरापासून निघणार आहे.

ज्ञानेश्वर कुमावत यांचे आज सोमवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दि. १२ रोजी दुपारी ४ वाजता मूळगावी मारवड येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. आमदार अनिल भाईदास पाटील यांचे ते (आ.अनिल दादा राजकारणात सक्रिय झाल्यापासून)गेल्या अनेक वर्षांपासून स्विय सहायक होते. मनमिळावू स्वभावामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणावर गोतावळा जमविला होता. त्यांच्या अकस्मात निधन वार्तेमुळे अनेकांना धक्का बसला असून संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.