fbpx

दसनूरला वाढदिवशीच तरुणावर काळाचा घाला

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जून २०२१ । रावेर तालुक्यातील दसनूर येथील तरुणाचा विजेच्या धक्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. अमित उर्फ ओम पाटील (वय २५) असे मृत तरुणाचे नाव आहे. दुर्देव म्हणजे त्याच दिवशी तरुणाचा वाढदिवसही होता. मागील वर्षी याच दिवशी त्याचा साखरपुडा देखील झाला होता. योगायोग असा मृत्यू देखील ९ जून याच दिवशी झाला. अशा प्रकारे त्या तरुणावर काळाने घाला घातला. काही महिन्यांपुर्वीच त्याचे लग्न झाले होते.

याबाबत असे की,  दसनूर येथील प्रगतशील शेतकरी अविनाश बाजीराव पाटील यांचा एकुलता एक मुलगा अमित हा नेहमी शेतीच्या कामात व्यस्त राहत असे. दरम्यान गावातच त्यांच्या नवीन घराचेही बांधकाम सुरु असल्याने तो बांधकामाच्या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आला. थोड्या वेळानंतर तो तरूण वर तयार झालेल्या गच्चीवर उभा होता. जवळूनच विजेच्या मुख्य प्रवाह असलेल्या तारांना अनावधानाने त्‍याचा स्पर्श झाला व त्याचा जागीच मृत्यु झाला. 

रावेर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. पुढील तपास निंभोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल उन्नवणे तसेच पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्टेबल आब्बास तडवी करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज