fbpx

डॉक्टर रावलानींचा एक महिन्याचा पगार कापा …. नगरसेवकांची स्थायी समितीत मागणी

 

जळगाव लाईव्ह न्युज | २० सप्टेंबर २०२१ | जळगाव महानगरपालिकेचे प्रमुख वैद्यकीय अधिकारी राम रावलानी यांचा १ महिन्याचा पगार कापण्यात यावा अशी मागणी आज झालेल्या स्थायी समिती मध्ये नगरसेवकांनी केली.

mi advt

 

महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व हॉस्पिटल्समध्ये ढिसाळ कारभार होत आहे. याचे कारण म्हणजे या सर्व कर्मचाऱ्यांवर वचक ठेवणारा खमक्या अधिकारी महानगरपालिकेत नाही. रावलानी यांचा स्वतः अशा कर्मचाऱ्यांवर वचक नाही यामुळे यांच्या एक महिन्याचा पगार कापला जावा अशी मागणी नगरसेवकांनी आज स्थायी समितीत केली.

 

 

नुकतेच वैद्यकीय कर्मचारी हाताला मेहंदी काढत असण्याचे फोटो व्हायाराल झाले होते. या कर्मचार्‍यांवर अधिकाऱ्यांचा वचक नसल्यामुळे अशा गोष्टी करायला यांची हिंमत होत आहे यामुळे अधिकारी रावलानी यांचा एक महिन्याचा पगार कापण्यात यावा.

 

 

कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत ज्या 116 आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना सेवा दिली त्यांनाच पुन्हा एकदा तिसर्‍या लाटेत काम करण्याची संधी देण्यात यावी अशीही यावे मागणी त्यांनी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज