टाकरखेडा येथे‎ शेती साहित्याची चोरी‎

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जानेवारी २०२२ । टाकरखेडा ( ता.यावल ) येथील शिवारातून‎ शेती साहित्य चोरीच्या घटनांमुळे‎ शेतकरी हैराण झाले आहेत. या‎ भुरट्या चोरट्यांवर कारवाई करावी,‎ या मागणीसाठी शेतकऱ्यांनी यावल‎ पोलिसांना निवेदन दिले.‎

रविवारी येथील पोलिस ठाण्यात‎ टाकरखेडा येथील शेतकऱ्यांनी‎ निवेदन दिले. त्यात गेल्या काही‎ दिवसांपासून शेत शिवारातून शेती‎ साहित्य चोरीच्या घटना होत आहेत.‎ नुकतेच अनेकांच्या शेतातून‎ स्प्रिंकलर, केबल आणी इतर शेती‎ साहित्य चोरी गेले. चोरट्यांचा‎ बंदोबस्त करावा, अशी मागणी‎ शेतकरी विजय चौधरी, रामचंद्र‎ चौधरी, समाधान चौधरी, विलास‎ चौधरी यांनी पोलिस उपनिरीक्षक‎ विनोद खांडबहाले यांच्याकडे केली.‎

हे देखील वाचा :

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -