जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची बदली

बातमी शेअर करा

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ सप्टेंबर २०२१ । जळगाव येथील जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांची धुळे येथे बदली झाली आहे. बदलीचे आदेश प्राप्त झाले असून जळगावचाही अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडे राहणार आहे.

शासनाने पारित केलेल्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा माहिती अधिकारी किरण मोघे यांची पुणे येथे बदली झाली आहे.

जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी धुळे येथे यापूर्वीही काम पाहिले असून आता पूर्णवेळ त्यांच्याकडे धुळे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar