जामुनझिरा आदिवासी वस्तीवर अमृत आहार योजनेत वाटले अर्धवट बॉइल अंडी ; आदीवासी नागरीकांची तक्रार.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२१ ।  तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या जामुनझिरा या आदिवासी वस्तीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजनेत अंडी वाटली. अशी तक्रार नागरिकांनी केली आहे.

हा प्रकार नागरीकांच्या निदर्शनास येताच नागरीकांना अर्धवट बॉइल अंडी घेवुन थेट यावल येथील एकात्मिक महिला, बाल विकास कार्यालय गाठले व प्रकल्प अधिकारी यांना अंडी दाखवत सेविके विरूध्द तक्रार केली. व अशा प्रकारे अर्धवट बॉइल केलेले अंडी वाटणाऱ्या सेविकेवर कारवाईची मागणी पोलिस पाटील हिरा पावरा, बिलारसिंग पावरा, भावसिंग पावरा, भाईराम पावरा, नरसिंग बारेला आदींनी केली आहे

सदरील सेविके कडून लेखी खुलासा मांगवण्यात येईल यात ती दोषी आढळल्यास तिच्या विरूध्द कारवाई करण्यात येईल असे प्रसंगी महीला व बाल विकास प्रकल्प अधिकारी अर्चना आटोळे यांनी सांगीतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -