fbpx

जागतिक परिषदेत जळगावचा गौरांक पाटील करणार मार्गदर्शन

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ४ जुलै २०२१ ।   समस्त जगावर उत्भवलेली कोरोना विषाणूच्या संकटा संकटामुळे समस्त जगभरातीळ व्यापाऱ्यांवर मोठा फटका बसला आहे. ज्यात बांधकाम क्षेत्राचाही सहभाग आहे. अश्या वेळेस बांधकाम क्षेतार असे काय  नवनवीन तंत्रज्ञान घेऊन उपलब्ध होणाऱ आहे या संबंधी  जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सव २०२१ चे आयोजन करण्यात आले आहे. आशिया खंडातील परिषद ५ जुलैपासून सुरू होत आहे. मंगळवार दि.६ रोजी जळगावचे युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून ते ‘बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग अँप्लिकेशन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

बांधकाम क्षेत्रात दररोज नवनवीन तंत्रज्ञान येत असून जगभरात त्याचा उपयोग केला जात आहे. जगभरातील निवडक बांधकाम अभियंत्यांचे मार्गदर्शन जगभरातील अभियंत्यांना मिळावे यासाठी जागतिक डिजिटल बांधकाम महोत्सवाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले आहे. डिजिटल कन्स्ट्रक्शन हा ऑनलाईन डिजिटल कन्स्ट्रक्शनचा सर्वात मोठा कार्यक्रम आहे.

आशिया खंडाची परिषद ५ जुलैपासून सुरू होणार असून त्यात जळगाव येथील युवा अभियंता गौरांक प्रशांत पाटील हे भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सहभागी होत आहे. परिषदेत गौरांक पाटील हे BIM बिल्डिंग इन्फॉर्मेशन मॉडेलिंग या विषयाची ओळख करून देणार असून डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या समन्वयाने अभियांत्रिकी, खरेदी व बांधकाम (EPC) प्रोजेक्ट संदर्भात मार्गदर्शन करणार आहे.

गौरांक हा माजी नगरसेवक प्रशांत पाटील यांचा मुलगा असून त्याने पुणे विद्यापीठातून बी.ई. सिव्हिल इंजिनिअरचे शिक्षण पूर्ण केले आहे. तसेच पुणे येथून ऍडव्हान्स कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमध्ये पीजीपी आणि एमबीए पूर्ण केले आहे. जळगावातील एका युवा अभियंत्याची जागतिक स्तरावरील परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी निवड होणे ही जिल्ह्यासाठी गौरवास्पद बाब आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज