जळगाव शहर महानगरपालिकेत दोन – दोन आयुक्त, नेटकरी उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । २ डिसेंबर २०२२ । जळगाव शहर महानगरपालिकेला सध्या दोन दोन आयुक्त मिळाले आहेत. आयुक्त विद्या गायकवाड आणि आयुक्त देविदास पवार असे दोन दोन आयुक्त मिळाले आहेत. यामुळे सोशल मीडियावर चांगलेच वातावरण खेळीमेळीचे झाले आहे.

तर झाले असे आहे की काही दिवसांपूर्वी आयुक्त विद्या गायकवाड यांची तडका फडकी बदली करण्यात आली होती. अवघ्या सात महिन्यात त्यांची बदली करण्यात आली होती. या बदली मागे मोठे राजकारण सुरू असल्याचे म्हटले जात होते. पर्यायी आयुक्त विद्या गायकवाड यांनी मॅटमध्ये धाव घेतली. मेक कोर्टाने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्याने त्यांची बदली रद्द झाली आहे. मात्र आयुक्त देविदास पवार यांना अजूनही कोणत्याही कोर्टाचे किंबहुना शासकीय आदेश आले नसल्याने अजूनही ते आपल्या आयुक्त पदावर आहेत. यामुळे महानगरपालिकेमध्ये एकच गोंधळ पाहायला मिळत आहे. मात्र नेटकरी याचा चांगलाच आनंद घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.

यांच्या या पदाच्या वादामध्ये नेटवर चांगलेच मीन्स व्हायरल होत आहेत. त्यातील काही मीन्स म्हणजे ज्या महानगरपालिकेचे एकही आयुक्ता मिळत नव्हता.आता दोन-दोन आयुक्ता मिळत आहेत. यामुळे आयुक्तांनी आपले वेगळे करून ठेवले आहेत. तर दुसरीकडे जळगाव शहर महानगरपालिकेच्या नवा विक्रम असेही म्हटले जात आहे एका पदावर दोन माणसं अशा प्रकारचे मिम्स सकाळपासून शेयर होत आहेत.

सर्वात जास्त शेयर होत असलेला मेसेज
जळगाव महापालिका मध्ये दोन आयुक्त आहेत. त्यांचा टाईम दहा ते दोन श्री देवीदास पवार. दोन ते सहा विद्या गायकवाड. असे महापालिकेला दोन आयुक्त मिळालेले आहे. आम्ही त्याबद्दल समाधानी आहोत. नागरिकांचे व लोकप्रतिनिधी प्रभागातील लोक हिताचे कामे लवकरात लवकर मार्ग लागतील अशी अपेक्षा करीत आहोत