fbpx

जळगाव शहरात दुचाकी चोरट्यांचा धुमाकूळ

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ मे २०२१ । गेल्या काही दिवसांपासून जळगाव शहरात  दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दररोज एक किंवा दोन दुचाकी चोरीला जाण्याच्या घटना आता नित्याच्याच झाल्या आहेत. या घटनांमुळे वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, दरम्यान, योगेश्वरनगर येथे घरासमोरून एकाची दुचाकी चोरीस गेल्याची घटना घडली. याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत असे की, योगेश्वर नगरात गणपती मंदिराजवळ भाडेकरारावरील खोलीत संदीप सुरेश वाणी हे पत्नी व दोन मुली या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. संदीप वाणी यांनी ४ मे रोजी रात्री नऊ वाजता नेहमीप्रमाणे त्यांची दुचाकी एमएच १९ सीडी  ३७६७ ही घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी ५ मे रोजी सकाळी ८.३० वाजता उठल्यावर घरासमोर त्यांची दुचाकी दिसून आले नाही.

mi advt

सर्वत्र परिसरात तसेच बस स्थानक, शहर पोलिस ठाणे, रामानंदनगर एमआयडीसी पोलिस स्टेशन याठिकाणी दुचाकीचा शोध घेतला. मात्र दुचाकीबाबत कुठलीही माहिती मिळाली नाही. संदीप वाणी यांनी याबाबत शनिपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास पोलिस नाईक अमोल विसपुते हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज