जळगाव शहरात एकही रास्ता नाही ज्यावर खड्डा नाही – आ. एकनाथराव खडसे

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ नोव्हेंबर २०२२ । जळगाव शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी माजी मंत्री आ.एकनाथराव खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबद नाराजी व्यक्त केली. याच बरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. प्रसंगी महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ.विद्या गायकवाड यांच्या सह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मिळालेल्या निधीतून वर्ष झाले तरी अद्याप कामे पूर्ण झालेली नाही. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव बदलण्याचा शब्द दिला होता. परंतु तसे काही झाले नाही. आताचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कामाकडे लक्ष देत नाहीत. अश्यावेळी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोमणा माजी मंत्री आ.एकनाथराव खडसेंनी लगावला आहे.

याच बरोबर सुरेश दादा जैन यांच्या विरोधात मी संघर्ष केला. मात्र त्यांच्या काळात काम निकृष्ट होत नव्हतं. आज होणार काम निकृष्ट आहे. शहरात एकही रास्ता नाही ज्यावर खड्डा नाही. नागरिकांचे हाल होत आहेत. पर्यायी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठे आंदोलन करणार आहे. असे ते म्हणाले.