Monday, August 8, 2022
Jalgaon Live News
Download App
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
Jalgaon Live News
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

जळगाव जिल्ह्यात तब्बल 9 लाख 65 हजार 391 घरांवर फडकणार तिरंगा

flag
चिन्मय जगतापbyचिन्मय जगताप
July 27, 2022 | 8:54 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जुलै २०२२ । भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. या भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नाशिक विभागात 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील शहरी व ग्रामीण भागातील घरांची एकूण संख्या 38 लाख 51 हजार 651 इतकी असून या प्रत्येक घरांवर तिरंगा फडकविण्यासाठी नियोजन करण्यात येऊन उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात यावा, असे आवाहन विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी संबंधित यंत्रणांना केले आहे. ज्यात जळगाव जिल्ह्याचा समावेश असून जळगाव जिल्ह्यात 9 लाख 65 हजार 391 घरांवर तिरंगा फडकणार आहे. जळगाव महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 2 लाख 85 हजार 235 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 6 लाख 80 हजार 156 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 7 लाख 65 हजार 727 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 99 हजार 664 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने नागरिकांच्या मनामध्ये स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृति तैवत रहाव्यात, या लढ्यातील क्रांतिकारक तसेच अज्ञात नायकांच्या घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे. तसेच प्रखर देशभक्तीची भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने आपल्या वैभवशाली इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव अंतर्गत ‘हर घर झेंडा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिक विभागातील नागरी भागात एकूण 10 लाख 62 हजार 578 घरे आहेत. नाशिक विभागातील ग्रामीण भागात एकूण 27 लाख 89 हजार 73 घरे आहेत. विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने पाचही जिल्ह्यांना एकूण 7 लाख 66 हजार 369 झेंडे पुरविण्याचे नियोजन करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात 12 लाख 05 हजार 288 घरांवर फडकणार तिरंगा

नाशिक महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात 4 लाख 25 हजार 240 घरांची संख्या असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 80 हजार 48 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 9 लाख 5 हजार 288 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 3 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात 08 लाख 99 हजार 666 घरांवर फडकणार तिरंगा

अहमदनगर महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 96 हजार 905 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 7 लाख 02 हजार 761 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 7 लाख 80 हजार 577 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 19 हजार 89 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

जळगाव जिल्ह्यात 9 लाख 65 हजार 391 घरांवर फडकणार तिरंगा

जळगाव महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 2 लाख 85 हजार 235 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 6 लाख 80 हजार 156 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 7 लाख 65 हजार 727 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 99 हजार 664 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

धुळे जिल्ह्यात 4 लाख 02 हजार 119 घरांवर फडकणार तिरंगा

धुळे महानगरपालिका व नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 1 लाख 8 हजार 914 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 2 लाख 93 हजार 205 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 2 लाख 73 हजार 503 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 1 लाख 28 हजार 616 लाख झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

नंदूरबार जिल्ह्यात 3 लाख 79 हजार 187 घरांवर फडकणार तिरंगा

नंदूरबार नगरपालिका क्षेत्रात घरांची संख्या 46 हजार 284 असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. तसेच ग्रामीण भागातील घरांची संख्या 3 लाख 32 हजार 903 इतकी असून तितकेच झेंडे फडकविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर 3 लाख 60 हजार 187 झेंडे उपलब्ध होणार असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून 19 हजार झेंडे पुरविण्यात येणार आहेत.

‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या यशस्वीतेसाठी प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली

‘हर घर तिरंगा’ अभियानाबाबतची प्राधिकृत सनियंत्रण प्रणाली (SOP) तयार करण्यात आलेली असून त्यानुसार झेंड्यांचे वितरण सुरळीतपणे करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. डोनेशन पध्दतीने देखील मोठ्या प्रमाणात जिल्हास्तरावर झेंडे उपलब्ध करून घेणेबाबतची मोहिम राबविली जात आहे.

२४ तास फडकणार तिरंगा

भारतीय ध्वजसंहितेमध्ये 30 डिसेंबर, 2021 च्या आदेशान्वये काही प्रमाणात दुरुस्ती करण्यात आली आहे. त्यानुसार पॉलीस्टर व यंत्राव्दारे तयार करण्यात आलेले झेंडे लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच सदर अभियानामध्ये झेंडा फडकविल्यानंतर तो दिवस व रात्र 24 तास फडकविण्यात येणार आहे. हे अभियान 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान विभागात यथोचितपणे राबविण्यात येणार आहे. कापड मिल, महिला बचत गट व स्थानिक विक्रेते यांच्याकडून जिल्हास्तरावर ध्वज उपलब्ध करून घेण्याची कार्यवाही सुरू आहे. IEC च्या माध्यमातून सदर अभियान राबविण्याबाबतची जनजागृती करण्यात येत आहे. शाळा व महाविद्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस विभाग व स्वस्त धान्य दुकानदार यांच्यामार्फत अभियान यशस्वी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सर्व शासकीय व नियम शासकीय यंत्रणांनी व्यापक प्रमाणात जाणीव जागृती मोहीम या उपक्रमासाठी प्रभावीपणे राबवावी. स्थानिक स्वराज्य संस्था, पोलीस यंत्रणा, शाळा व महाविद्यालय, परिवहन, आरोग्य केंद्र, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडित यंत्रणांचा वापर करून हर घर झेंडा हा उपक्रम यशस्वीपणे राबवावा, असेही श्री.गमे यांनी यावेळी सांगितले.

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज

DMCA.com Protection Status
in जळगाव जिल्हा, ब्रेकिंग, सामाजिक
SendShareTweet
चिन्मय जगताप

चिन्मय जगताप

पत्रकारिता क्षेत्रात गत ३ वर्षांपासून कार्यरत. जळगाव शहरात रिऍलिटी चेकचा विशेष अनुभव. मनपा, राजकारण क्षेत्रातील वृत्त संकलन. लाईव्ह, स्टुडिओत अँकरिंग. विशेष मुलाखतींची हाताळणी. विशेष वृत्त लेखन तसेच वृत्त संपादन.

deokar-advt

Copy
Next Post
rashi 1

आजचे राशीभविष्य - २८ जुलै २०२२ : 'या' राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक लाभ होण्याची शक्यता..

jalgaon crime

अट्टल दुचाकी चोरटा गजाआड, २७ दुचाकी हस्तगत!

jalgaon nashik

मासिक पाळीप्रकरणी पीडित विद्यार्थिनीच्या हस्ते अंनिसतर्फे वृक्षारोपण!

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव जिल्हा
    • जळगाव शहर
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • रावेर
    • यावल
    • चोपडा
    • भडगाव
    • जामनेर
    • पारोळा
    • पाचोरा
    • धरणगाव
    • एरंडोल
    • बोदवड
    • अमळनेर
    • मुक्ताईनगर
  • ब्रेकिंग
  • विशेष
  • राजकारण
  • प्रशासन
    • जिल्हाधिकारी कार्यालय
    • महापालिका
    • जिल्हा परिषद
  • गुन्हे
  • नोकरी संधी
  • सरकारी योजना
  • वाणिज्य
  • व्हिडीओ

© 2017 Powered by ContentOcean Infotech Private Limited.

Join WhatsApp Group