fbpx

जळगाव : केमिकल कंपनीतील टॅंकमध्ये पडून तिघांचा मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । १५ मे २०२१ । जळगावातील एमआयडीसीमधील समृद्धी केमिकल कंपनीतल्या टॅंकमध्ये पडून तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज शनिवार दुपारी घडलीय. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.

जळगावातील जुनी एमआयडीसीतील अ सेक्टरमधील समरुद्धी केमिकल कंपनीमध्ये आज दुपारी टाकी साफ करतांना तीन जणांचा मृत्यू झाला. यात रवींद्र गोटू झगडू कोळी (वय ३० रा. चिंचोली या. यावल) दिलीप अर्जुन सोनार (वय ५४ मूळ खिरोदा ह.मु. कांचन नगर) आणि मयूर विजय सोनार (35 रा. दिलीप किराणा कांचन नगर) या तिघांचा मृत्यू झाला आहे.

mi advt

दरम्यान, दिलीप सोनार हे साफ सफाई साठी गटार मध्ये उतरले होते. यावेळी त्यांचा अचानक तोल गेल्याने त्यांनी आरडा ओरड सुरू केली असता कंपनीत काम करणारा दुसरा हेल्पर  मयूर सोनार हे मदत करण्यासाठी आले असता त्यांचा देखील यावेळी तोल गेला आणि तेही गटारीत पडले. यावेळी मयूर यांनी देखील मदतीसाठी आरडा ओरड सुरू केली असता एक गाडी जात असताना ड्रॉवर रवींद्र झगळु कोळी थांबला तोहि मदतीसाठी गेला असता त्याचा ही  तोल गटारीत गेला.  यावेळी कंपनीत काम करणारे दुसरे कर्मचारी यांनी त्यांना बाहेर काढले व जिल्हा रुग्णालयात आणले असता

वेधकीय अधिकारी डॉक्टर सचिन अहिरे यांनी तपासून मृत घोषित केले.  तिघांचे मृतदेह सिव्हील हॉस्पीटलमध्ये आणले आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज