fbpx

जळगावात तरुणाच्या समोसामध्ये आढळली पाल ; गोकुळ स्वीटमधील प्रकार

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जून २०२१ । जळगाव शहरातील गोकुळ स्वीट येथे समोसामध्ये पालीची शेपटी आढळून आली आहे. दरम्यान, हा समोसा खाल्या नंतर गौरव कृष्णा पाटील याला त्रास झाल्याने अश्विनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

याबाबत असे की, शहरातील गोकुळ स्वीट येथे आज शुक्रवारी दुपारी तीघ मित्र नाश्ता करण्यासाठी गेले होते. यावेळी गौरव पाटील या तरुणाच्या समोसामध्ये पालीची शेपटी आढळून आली. गौरव याला कळवत वाटू लागल्याचे लक्षात आल्याने त्यामध्ये बघितले असता त्यात पालीची शेपटी आढळून आली. यानंतर गौरव पाटील याला अश्विनी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले आहे.

mi advt

या प्रकाराबाबत हॉटेल व्यवस्थापन आणि अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार केली.तक्रारीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी हॉटेलची आणि किचनची तपासणी केली. दरम्यान, या घडलेल्या प्रकाराबाबत गोकुळ स्वीट यांच्यावर कारवाई केली जाणार? याकडे लक्ष लागून आहे

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज