जळगावच्या कापड व्यवसायिकांचा वाजतो अख्या मुंबईत डंका

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ फेब्रुवारी २०२२ । जळगाव कपड्यांची मोठी बाजारपेठ आहे. लांबलांबहुन मोठ्या प्रमाणावर नागरिक इथे येऊन कपडे खरेदी करतात. आणि मोठ्या प्रमाणावर उलाढाल जळगावच्या कपडा बाजारपेठेमध्ये होत असते. अशावेळी ज्या मुंबईहून सर्वाधिक कपड्यांचा माल जळगावच्या बाजारपेठेत येतो अशा मायानगरी मुंबईमध्ये जर कोणत्या शहराच्या व्यवसायिकांचा डंका वाजत असेल तर तो म्हणजे जळगावच्या व्यवसायिकांचा (jalgaon cloths market)

जळगावमध्ये खूप मोठी कपड्यांची बाजार पेठ आहे. जळगावमध्ये जयपूर, बुऱ्हानपूर, दिल्ली, नाशिक, अमरावती, धुळे, नंदुरबार अशा विविध ठिकाणहून नागरिक कपडे खरेदी करायला येतात किंवा व्यवसायिकांकडून कुरिअरने कपडे मागवतात. त्याचे मूळ कारण म्हणजे जळगावच्या कपड्यांना जी फिटिंग आहे. ती इतर कुठल्याही कपड्यांना नाही. असं म्हटलं जातं. प्रत्येक व्यवसायिक हा आपल्या ग्राहकासोबत कौटुंबिक संबंध जोपासत असल्यामुळे जळगावच्या व्यवसायिकांची आणि ग्राहकांच एक वेगळेच नातं आहे. म्हणूनच की काय? तर लांबून लांबून लोक फक्त जळगावात कपडे घ्यायला येतात. मात्र दुर्दैव याचा की जळगावच्या लोकांना जळगावच्या कपडा मार्केट बद्दल कित्येक चांगल्या गोष्टी माहित नाहीत.

जे कपडे मुंबई किंवा पुण्यामध्ये तीन ते चार हजार रुपये पर्यंत विकली जातात तेच कपडे जळगावात दीड ते अडीच हजार रुपयांमध्ये विकले जातात. जळगावात कपडे स्वस्त मिळतात म्हणून बाहेरच्या शहरातील नागरिक जळगावात येऊन कपडे विकत घेतात. हे बाहेरच्या नागरिकांना माहिती आहे मात्र जळगावकरांनाच हे माहीतच नाही

मात्र मुंबईत जळगावचा डंका कसा वाजतो? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. त्याच सर्वात महत्त्वाच कारण म्हणजे जळगावचे व्यवसायिक कधीही कोणाचेच पैसे बुडवत नाहीत. जळगाव ही मोठी बाजारपेठ असल्यामुळे क्रेडिटवर म्हणजेच उधारीवर कित्येकदा मोठ्या प्रमाणावर कपड्यांचा माल हा जळगावत आणला जातो. कोणत्याही परिसरातील व्यवसायिकांना उधारावर माल तेव्हाच मिळतो जेव्हा त्यांनी कधीच कोणाचाच पैसा बुडवलेला नसतो. यामुळे समोरच्याबद्दलचा विश्वास वाढतो. असाच विश्वास संपूर्ण मुंबईमध्ये जळगावचा व्यवसायिकांबद्दल आहे. जळगावचे व्यवसायिकाने माल घेतला म्हणजे पैसे परत मिळणारच हे अख्ख्या मुंबईला माहिती आहे. म्हणून जळगावहून कोणीही व्यवसायिक मुंबईत गेला की त्याला मोठ्या प्रमाणावर माल दिला जातो. अशा प्रकारचा स्वतःचा दबदबा जळगावच्या कपडा व्यावसायिकांनी मुंबईमध्ये निर्माण केला आहे.

भिवंडी, वसई, विरार, कल्याण, उल्हासनगर, दादर, जोगेश्वरी, फोर्ट, मनीष मार्केट, काच मार्केट अशा विविध ठिकाणाहून जळगावत कपडे मुंबईहून येतात. तिथे मोठमोठे व्यवसायिक आहेत. जे कपड्यांचा व्यवसाय करतात आणि जळगावचे व्यवसायिक त्यांच्याकडे कपडे घेण्यासाठी गेले तर एका क्षणात कपडे देऊन मोकळे होतात आणि पैसे परत कधी मिळतील असा साधा प्रश्नही विचारत नाही.