जळगावकराचे ‘हे’ पत्र वाचून तुम्हालाही येईल राग

जळगाव लाईव्ह न्यूज। ११ फेब्रुवारी २०२३ । जळगाव शहर चारही बाजूने समस्यांनी वेढले गेले आहे. अशी एकही समस्या नाही जी जळगाव शहरात नाही. मात्र आता जळगाव शहरात अनधिकृत अतिक्रमणाची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. अशावेळी मनपा प्रशासन यावर कोणतीही कारवाई करत नसल्याचा ठपका महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागावर ठेवला जात आहे. यातच एका जळगावकरांनी एक पत्र महानगरपालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, महापौर जयश्री महाजन व अतिक्रमण निर्मूलन अधीक्षकांना लिहिले आहे. (LETTER TO JALGAON MUNICAPAL CORPORATION)

वाचा काय लिहिले आहे त्या पत्रात

सौ. महापौरताई
सौ. आयुक्त मँडम
आणि अतिक्रमण निर्मूलन अधिक्षक जळगांव शहर महानगरपालीका

महाशय,
आपणास सांगावेसे वाटते कि आपल्या शहराचा अतिक्रमण विभाग ताबडतोब बंद करावा म्हणजे कोणालाही, कोठेही, केव्हाही, कधीही व्यवसाय करता येईल . त्यामुळे कोणालाही हप्ता देता येणार नाही. त्यामुळे त्या अतिक्रमण धारकाला आपला कमाईत थोडीफार भर पडेल .


तसेही जळगांवात कायद्याचे राज्य राहिलेले नाही . अतिक्रमण विभाग बंद केल्यामुळे तेथिल कर्मचारी दुसर्या ठिकाणी काम करतील व त्या विभागाला दिलेली वाहने दुसर्या ठिकाणी वापरता येतील. तसेच इंधनावर होणारा खर्च हि वाचेल , असेही जळगांव शहर विद्रुप झालेले आहेच, बेशिस्त शहर म्हणून आपले नाव आघाडीवर आहे , अस्वच्छ शहर, खड्डेमय शहर असे अनेक उपमा आपल्या शहराला मिळालेल्या आहेतच .


त्यासाठी वरील प्रमाणे सर्व अधिकारी , पदअधिकारी , नगरसेवक आपणा सर्वा नम्रपणे विनंती कि, मी जे लिहलेले आहे त्याचा लवकरात लवकर विचार करावा

आपला
पृथ्वीराज सोनवणे
मा. नगरसेवक
जळगांव