fbpx

जय हो.. घटस्थापनेपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे उघडणार!

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ सप्टेंबर २०२१ । गेल्या अनेक महिन्यांपासून मंदिरे, धार्मिक स्थळे उघडण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या जनतेसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेत दिलासा दिला आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर येत्या ७ ऑक्टोबरपासून राज्यातील मंदिरे आणि इतर सर्व धार्मिक स्थळे उघडण्यात येणार आहेत. शासनाने याबाबतचा आदेश जारी केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन आठवड्यांपूर्वी राज्यात टप्प्याटप्प्याने मंदिरे उघडण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडली जाणार आहेत. शासनाच्या या निर्णयाचे सर्वधर्मीयांकडून स्वागत करण्यात आले आहे.

mi advt

धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये, असे कळकळीचे आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना केले आहे. कोरोनाची पुढील लाट टाळण्यासाठी सर्वांनी योग्य ती खबरदारी घेत त्रिसूत्रीचे पालन करावे असेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज