fbpx

जखमी झालेल्या हरणाचा मृत्यू ; मनसेची कारवाईची मागणी

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ जून २०२१ । वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या हरणाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्यामुळे वन खात्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी मनसेने केली आहे.

यावल -भुसावल मार्गावरील वाघळुद फाट्याजवळ एका वाहनाच्या धडकेत जखमी झालेल्या हरणाचा उपचारा अभावी पर्यावरण सप्ताह सुरू असतांना मृत्यू झाल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. याकडे जानीवपुर्वक दुर्लक्ष करणा-या वन विभागाच्या अधिका-यावर कठोर कारवाई करावी अशी मागनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

आज यावल ते भुसावल मार्गावरील वाघळुद फाट्यावर एका वाहनाने धडक दिल्याने पाच वर्ष वयाच्या हरिण गभिर अवस्थेत पडलेली होती. यावल येथील मनसेचे कार्यकर्ते विक्की बाविस्कर  यांनी यावल येथील मिनीडोर चालक प्रशांत बारी यांच्यासोबत भुसावळहून मिनीडोर मध्ये येत असतांना घटनास्थळावरून हरिणास उचलून यावल येथील वनविभागाच्या कार्यालयात उपचारासाठी आणले तेथे पक्ष्चीम क्षेत्राचे विशाल कुठे हे हजर होते. त्यांनी याकडे पुर्णपणे दुर्लक्ष केले मनसे पदाधिकाऱ्यांनी त्यांना तात्काळ उपचार करण्याचे सांगितले त्यांनी एका कर्मचारास सांगुन एका कार्यक्रमास जायचे आहे असे सांगून ते निघून गेले.

हरिणावर उपचारासाठी दिड तासापर्यंत वनविभागाकडून कुठलेही प्रयत्न झाले नाही .अखेर त्या हरणाचा तडफून म्रुत्यु झाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष चेतन आढळकर यांनी संतप्त भूमिका घेतली आहे दुर्लक्ष करणा-यावर कारवाई करवी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt