fbpx

छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन यावलतर्फे सराव परीक्षा उत्साहात

जळगाव लाईव्ह न्यूज । ०१ जुलै २०२१ । छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन संचलित संकल्प करिअर अकॅडमी यावल येथे आज जनरल नॉलेज ची सराव परीक्षेचे येथे आज जनरल नॉलेजच्याआयोजन करण्यात आले होते. यात सुमारे 150 विध्यार्थी – विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतला. तसेच याच कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात प्रमुख म्हणून आमदार शिरीष चौधरी यांचे चिरंजीव धनंजय चौधरी व छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष ऍड.देवकांत बाजीराव पाटील, कोरवापलीचे सरपंच विलास अडकमोल यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला.

mi advt

कार्यक्रमात उपस्थिती बद्दल करिअर अकॅडमीचे संचालक बादल तायडे व सावन तायडे यांनी आभार मानले. बक्षीस वितरणापूर्वी कार्यक्रमात ऍड देवकांत पाटील व धनंजय चौधरी यांनी  विद्यार्थांना मार्गदर्शन करून करिअर अकॅडमीला मदतीसाठी नेहमी तत्पर राहू,अशी हमी देत संचालक बादल तायडे (राष्ट्रीय खेडाडू )मुंबई पोलीस यांचे या अभिनव उपक्रमाचे कैतुक करत अल्प आशा फीजमध्ये राबवत असलेल्या बद्दल या  कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी संचाकल बादल तायडे, सावन तायडे आणि सहकार्याने परिश्रम घेतले

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज