चौथी राष्ट्रीय हातमाग गणना विणकरांनी संपर्क साधण्याचे आवाहन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ सप्टेंबर २०२१ ।  चौथी राष्ट्रीय हातमाग गणना-2017 संपूर्ण देशात आयोजित करण्यात आली होती. या गणनेचे काम महाराष्ट्र राज्यामध्ये मे. कर्वी डाटा मॅनेजमेंट सर्व्हीस लि. हैद्राबाद या संस्थेमार्फत पुर्ण झाले आहे. तथापि, या हातमाग गणनेतून सुटलेले, अनावधानाने रहिलेले हातमाग विणकरांना समाविष्ट करण्यासाठी सर्व हातमाग विणकर तसेच संलग्न विणकर, मजूर यांना अंतिम संधी देण्यात येत आहे.

ज्या विणकरांचा समावेश हातमाग गणनेत झालेला नसेल त्यांनी जवळच्या कार्यालयाशी संपर्क साधून जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था/उपनिबंधक सहकारी संस्था/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तसेच प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई, 7 वा मजला, चरई टेलिफोन एक्स्चेंज बिल्डींग, मावळी मंडळ रोड, ठाणे (पश्चिम) 400601, दुरध्वनी क्रमांक- 022-25405363 वर संपर्क साधावा. विहित नमुन्याचा अर्ज घेऊन तो संपुर्ण माहिती भरून छायांकित कागदपत्रे जोडून दिलेल्या पत्तावर व [email protected] या ईमेलव्दारे 10 दिवसांच्या आत पाठविण्यात यावा. असे सु. म. तांबे, प्रादेशिक उप आयुक्त, वस्त्रोद्योग, मुंबई यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -