चाळीसगाववासीयांना महाविकास आघाडी कडून मदत मिळावी: हर्षवर्धन खैरनार

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज | ३ सप्टेंबर २०२१ | चाळीसगाव येथे मागील मंगळवारी पूर आला. त्यात चाळीसगाव मधील बरेच खेडे वाहून गेले आहे. शेतकऱ्यांचे बरेच नुकसान झाले आहे . या संदर्भात जळगाव राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हासरचिटणीस हर्षवर्धन खैरनार यांनी मुंबईत खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली व चाळीसगाव पुरग्रस्तांसाठी सांगली तसेच रत्नागिरीला ज्या प्रमाणे मदत दिली त्याच प्रमाणे चाळीसगाव वासीयांना सुद्धा महाविकास आघाडी कडून मदत मिळावी यासाठी निवेदन दिले.

तसेच आपण या संदर्भात उपमुख्यमंत्री अजितद पवार यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी राष्ट्रवादीचे हर्षवर्धन खैरनार यांनी केली. व खासदार सुप्रिया सुळे यांनी लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून मदत लवकर मिळवून देऊ असा विश्वास दिला.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -

deokar