fbpx

ग्राम पंचायतीच्या गलथान कारभारामुळे वन व्यवस्थापन समितीची पुनर्रचना स्थगित

 

mi advt

जळगाव लाईव्ह न्यूज | १९ सप्टेंबर २०२१ |  तालुक्यातील मौजे सुकळी येथील ग्राम पंचायतीच्या गलथान कारभारामुळे वनव्यवस्थापनसमितीची पुनर्रचना होत नसल्याने स्थानिक वनसंवर्धनास बाधा उत्पन्न होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यामुळें वन्यप्रेमींत नाराजी व्यक्त होत आहे.

३१ आॅगस्ट रोजी मौजे सुकळी येथे ग्रामसभा पार पडली.ग्रा.पं.च्या नियोजनाअभावी मध्येच गोंधळ उडाल्यामुळे ग्रामसभेतील अनेक विषयावरील चर्चा अपुर्णावस्थेत राहील्या मात्र रोजगार सेवक निवडीबाबत व वनव्यवस्थापन समिती बाबत चे विषयावर चर्चा पार पडुन जनतेकडून सुचविलेल्या नावाप्रमाणे ग्राम पंचायत कडुन संबधित ठराव मिळणे अपेक्षित असतानासुद्धा ग्रामसेवक आजारी असल्याचे कारण दाखवुन गावात फिरकला नसल्याने ठराव मिळत नसल्याची खंत आहे‌. तसेच सरपंच गावात स्थित नसल्याने ग्रामसेवकावर वचक राहीला नसल्याची चर्चा गावात होत आहे.

ग्राम पंचायत अंतर्गत सुकळी व डोलारखेडा या दोन गावच्या वन व्यवस्थापन समित्यांची पुनर्रचना होणे आवश्यक आहे.सदर शिवारार्तगत असलेला जंगल पट्टेदार वाघांचा अधिवास क्षेत्र असल्याने संवेदनशील आहे.

कोरोनाकाळामुळे ग्रामसभा कित्येक दिवसांपासून झालेली नव्हती यामुळे समित्यांची पुनर्रचना अद्यापपर्यंत बाकी होत्या.दरम्यान ग्रामसभेत झालेल्या नागरीकांच्या गोंधळामुळे अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकल्या नसल्याने ग्रामस्थांना भेडसावणारे अनेक प्रश्न व समस्या कायम असुन सरपंच कायमस्वरुपी गावात रहात नसल्याने ग्रामसेवकार वचक राहिला नसुन ग्रामसेवक गावात फिरकत नसल्याने विकास कामांचा खोळंबा होत आहे. सुकळी येथील बैठकीत सुभाष धाडे यांचा आलेला अर्जावर जनतेने बहुमत दाखवत सहमती दर्शविली खरी पण ग्राम पंचायत कडुन ठरावाबाबत पुढील कामकाज होत नसुन ठराव मिळत नसल्याने ग्राम पंचायतीच्या कारभारावर संशय व्यक्त केला जात आहे.

दरम्यान डोलारखेडा येथील बैठकीत जनतेने सुचविलेल्या विनोद थाटे यांना ठराव देणेबाबत टाळाटाळ होत असल्याने थाटे यांनी ग्रामसेक यांचे घर गाठुन ठराव आणला मात्र खरा परंतु सरपंच सध्या जळगावी असल्याने ठरावावर सरपंचांची सही बाकी असल्याने तोही ठराव अद्याप बाकी आहे.

यासह ग्रामस्थांच्या असंख्य तक्रारी व समस्यांचे निराकरण खोळंबले असतांना ग्रामसेवक आजारपणाचे कारण पुढे करून गावात फिरकत नसल्याने ग्राम पंचायत सदस्यांसह गावकरी त्रस्त आहे.

       ” सरपंच गावात स्थित नसल्याने ग्रामसेवकावर वचक नाही,आजारी असल्याचे सांगुन ग्रामसेवक अठरा दिवसांपासून गावात नाही.याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार आहोत..!”

नंदकुमार नमायते, उपसरंपंच सुकळी

 

  ” वन व्यवस्थापन समितीच्या पुनर्चनेचा ठराव गेल्या पंधरा दिवसांपासून मिळत नव्हता,ग्रामसेवक यांचे घर गाठुन ठराव मिळवला परंतु त्यावर सरपंचांची सही अजुन बाकी आहे.

विनोद थाटे,डोलारखेडा

 

     ग्रामसेवक सुमारे अठरा दिवसांपासून गैहजर आहे त्यामुळे गावातील अनेक समस्या जैसे थे तैसेच आहे.याबाबत वरीष्ट पातळीवर तक्रार करणार आहोत

  शारदा कोळी,ग्रा.पं.सदस्या सुकळी

 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज