fbpx

गोदावरी अभियांत्रिकीतर्फे क्रिडा पुरस्कार प्रदान : जिल्ह्यातील 60 खेळाडुंचा गौरव 

mi-advt

 

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ ऑगस्ट २०२१ । जळगाव जिल्हा हॉकी असोसिएशन जळगांव व गोदावरी फाऊंडेशन संचलित गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे आज राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात आले.खेळाडूंचा सन्मान हा आपल्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण असून विश्वचषक जिंकणाऱया संघाची भेट घेतली त्या सोहळ्याची आज आठवण झाली असे गौरवोद्गार डॉ. केतकी पाटील यांनी काढले.या जिल्हा क्रीडा पुरस्कार सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ केतकी पाटील,माजी आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाले,जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील व क्रीडा संचालक प्रा. डॉ. आसिफ खान उपस्थित होते.

यामध्ये 49 क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार तसेच गणपत संभाजी पोळ ( सर ) राधेश्याम माधवलाल कोगटा, डॉ. प्रदीप प्रभाकर तळवेलकर, विष्णू रामदास भंगाळे, प्रोफेसर डॉ. किशोर पंडितराव पाठक, मिर्झा इकबाल बेग उस्मान बेग यांना क्रीडा जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सदर जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी ४ गट तयार करण्यात आले. यात खासगी इंग्लिश मिडीयम शाळा, अनुदानित माध्यमिक शाळा,उच्चमाध्यमिक(ज्यू.कॉलेज) महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय असा समावेश होता . याशिवाय ४४ क्रीडा शिक्षकांना गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय, भुसावळ रोड, एम. आय. डी. सी. जळगाव. येथे पार पडला.सर्व प्रथम मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस मान्यवरांनी पुष्पगुच्छ अर्पण करून अभिवादन केले. माजी आ. चंद्रकांत सोनावणे यांनी असो. माध्यमातून प्रत्येक वर्षी 50 खेळाडूंचा सन्मान करण्याचा मानस बोलून दाखवला. तर खेळाला प्रोस्साहन देण्यासाठी प्रयत्न करून मोठे खेळाडू घडावे अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. आसिफ खान यांनी केले. तर आभार प्रा. शाफिक अन्सारी सर यांनी केले.
कार्यक्रम यशस्विते साठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच हॉकी असोसिएशन जळगाव चे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज