fbpx

गेंदालाल मील रस्त्यावर पादचाऱ्याला लुटले !

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२१ । जळगाव शहरातील गेंदालाल मील परिसर रस्त्याने पायी जात असलेल्या एका इसमाला दोघांनी धमकावत लुटल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली.

चाळीसगाव येथील रहिवासी दिलीप भीमराव जाधव वय ४७ हे शुक्रवारी दुपारी सुरत येथून रेल्वेने पुतणीच्या घरी गेंदालाल मिल येथे आले होते. सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ते गेंदालाल मिल रस्त्याने पायी फिरत असताना दिशा मेडिकलसमोर दोन अनोळखी इसमांनी त्यांना अडविले त्यापैकी एकाने त्यांच्या शर्टाच्या वरच्या खिशात हात घालून जबरदस्तीने १२०० रुपये काढून घेतले. 

याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात मुसेप मुलतानी याच्यासह एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास अक्रम शेख करीत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज