गुडन्यूज : गिरणा नदीला उद्या सुटणार पिण्याच्या पाण्याचे आवर्तन

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूज । ०६ एप्रिल २०२१ । गिरणा धरणात सध्या ४७.६६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.  गिरणा धरणातुन उदया  दि. ७ रोजी सकाळी  ६ वाजता गिरणा नदीला एकुण १५०० क्युसेस पाण्याचे आवर्तन सोङण्यात येणार  आहे.

तरी नागरीकांनी गिरणा नदीच्या पाञात फिरु नये. सतर्गता बाळगावी. नागरीकांनी काळजी घ्यावी. असे आवाहन नागरीकांना नाशिक पाटबंधारे विभागाचे गिरणा धरण  शाखा अभियंता एस आर पाटील, उपविभागीय अभियंता एच व्ही पाटील, कार्यकारी अभियंता श्री.  ङी  बी बेहरे  साहेब यांनी पाटबंधारे विभागामार्फत  केलेले आहे. यामुळे गिरणा काठालगत गावांचा पिण्याच्या पाण्याचा व जनावरांचा पिण्याच्या पाण्याचा, शेती सिंचनाचाही  प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -