fbpx

खिशातील पैसे काढून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी 3 जणांवर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह न्यूज | तुषार देशमुख | घरासमोर आरडाओरडा करीत असताना इथून निघून जा असे बोलण्याचा राग येऊन शिवीगाळ करत चाकूचा धाक दाखवून खिशातुन 1000 रुपये काढून तिघांनी एकास जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना चाळीसगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत माहिती अशी की शहरातील लक्ष्मी नगर मधील राजेंद्रसिंग बाबूसिंग चितोडिया (52) दिनांक 21 रोजी 12.5 वाजेच्या सुमारास घरात असताना निखील अजबे रा. नारायणवाडी एस.मार्ट समोर, ऋषिकेश पाटील रा.श्रीकृष्ण कॉलनी करगाव रोड चाळीसगाव, आशिष इरकल रा.शिव कॉलनी चाळीसगाव हे घराबाहेर आरडाओरडा करीत असताना त्यांना येथून निघून जा असे बोलण्याचा राग येऊन त्यांनी राजेंद्रसिंग यांना शिवीगाळ करून ऋषिकेश पाटील याने त्यांची कॉलर पकडून ओढतान केली. व आशिष इरकल याने चाकू दाखवून पैशाची मागणी केली. तर निखील अजबे याने खिशातील 1000 रुपये काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केल्यास चाकुने मारेल अशी धमकी दिली.

याप्रकरणी राजेंद्रसिंग बाबुसिंग चितोडिया यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिघा संशयितांचा विरोधात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला भादंवी कलम 394, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज