जळगाव लाईव्ह न्यूज । २१ फेब्रुवारी २०२३ । संपूर्ण महाराष्ट्राचं ज्या पोटनिवडणुकीकडे लक्ष लागल आहे ती निवडणूक म्हणजेच चिंचवड विधानसभा पोट निवडणूक . याच निवडणुकीच्या प्रचाराचे बॅनर थेट जळगावमध्ये झळकल्याचे पाहायला मिळत आहेत.
चिंचवड पोट निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. भाजपाकडून अश्विनी जगताप विरुद्ध आघाडीचे नाना काटे यांच्यात लढत पाहायला मिळत आहे. यामुळे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या पुणे जिल्ह्यामध्ये नक्की मतदार कोणाला साथ देतात याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष आहे. मात्र सगळ्यात विशेष बाब म्हणजे या निवडणुकीचे बॅनर थेट जळगावात लागले आहेत.
पुणे, पिंपरी, चिंचवड या ठिकाणी उद्योग धंदे करण्यासाठी जळगावतून मोठ्या प्रमाणावर तरुण जातात. त्यांच्यासोबत त्यांचा अख्खा परिवार ही पुण्यामध्येच स्थायिक होतो. अशी असंख्य उदाहरण आपण पाहू शकतो. जळगावत नसलेल्या उद्योगांच्या संधीमुळे मोठ्या प्रमाणावर तरुण पुणे येथे स्थायिक झाले आहेत.पुणे येथे आता मतदार झाले आहेत. जळगावच्या मूळ मतदारांना आकर्षित करण्यासाठी राहुल कलाटे यांनी तरकीब लढवली आहे.
राहुल कलाटे यांनी शिवसेनेत बंडखोरी करून बंडखोर उमेदवार म्हणून फॉर्म भरला आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे उभे आहेत तर त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्ष मोठ्या ताकदीने उभे आहेत. मात्र आता राहुल कलाटे यांना चांगलाच धक्का बसला आहे. तो म्हणजे शिवसेनेसोबत युती केलेल्या प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी मध्ये फूट पडली असून मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते हे थेट राष्ट्रवादीमध्ये सामील झाले आहेत.
एकीकडे कलाटेंना नाही तर महाविकास आघाडीला पाठिंबा द्यावा अशी शहरातील बहुतांश पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका होती ती डावलून कलाटेंच्या समर्थन करण्यात आले. आम्ही दुखावलं होतं म्हणून आम्ही आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहोत असे राष्ट्रवादीत गेलेल्या वंचितच्या पधिकाऱ्यांतर्फे सांगण्यात येत आहे.
मात्र कलाट्यांना कितीही मोठा धक्का बसला असला तरी राहुल कलाटे यांची प्रचाराची तरकीब संपूर्ण जळगाव शहरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.