खडसेंना धक्का बसला आम्हाला नाही ; गिरीश महाजन यांची टीका

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ सप्टेंबर २०२१ । आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही बोदवड मुक्ताईनगर येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते. खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं’ असं म्हणत भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.

‘जळगाव जिल्ह्यातील 11 भाजपा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी भाजपला धक्का दिल्याचे म्हटलं होतं. मात्र आम्हाला कुठलाही धक्का जिल्ह्यामध्ये नाही बोदवड मुक्ताईनगर येथील शिवसेनेत गेलेले सगळे नगरसेवक खडसे समर्थक होते. खरंतर हे राष्ट्रवादीमध्ये जाणं अपेक्षित होतं. आतापर्यंत मुक्ताईनगर मतदारसंघात खडसे समर्थक जे होते. मात्र आता त्यांचे समर्थक देखील त्यांचे राहिले नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आम्ही आमचे अस्तित्व त्या ठिकाणी दाखवू’ अशी प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली.

‘धार्मिक स्थळ उघडी करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केली. एकीकडे कोरोनाचे कारण दाखवले जात होते, मात्र महाविकास आघाडीचे नेते हजारो लोकांचे कार्यक्रम घेतात त्याला मात्र कुठेही बंदी नसून भाविकांना मात्र मंदिरं बंद हे शासनाची दुटप्पी भूमिका होती, अशी टीकाही महाजन यांनी राज्य सरकारवर केली.

‘आरोग्य विभागाने गाजावाजा करत भरती करत असल्याचे सांगत साडेसहा हजार जागा काढल्या व यासाठी तीन लाखांवर लोकांनी अर्ज केले परीक्षेची तारीख जाहीर केली हॉल तिकीट दिली व वेळेवर परीक्षा रद्द केली. शासनाच्या भोंगळ कारभाराचं हे उत्तम उदाहरण असून आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा रद्द करून माफी मागितली हे म्हणजे थट्टा करण्यासारखे आहे, अशी टीकाही महाजन यांनी केली.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज