fbpx

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे टाळावे

mi-advt

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजीत राऊत यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालये आणि शासकीय महामंडळे येथे अभ्यागतांना 30 एप्रिल, 2021 पर्यंत प्रवेशास मनाई करण्याचे आणि अभ्यागतांसाठी ऑनलाईन सेवा सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार शासकीय कार्यालयाचे प्रतिनिधी, माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकार व अभ्यागतांनी जिल्हा माहिती कार्यालयात येण्याचे शक्यतो टाळावे. असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयाशी संबंधित प्रसिध्दीपत्रक, अर्ज, वैयक्तिक निवेदने, खुलासा, जाहिरात प्रसिध्दी व इतर पत्रव्यवहार [email protected] या ईमेलवर पाठवावा. कार्यालयीन सुट्टीच्या दिवशी व कार्यालयीन वेळेनंतर अत्यंत महत्वाचे प्रसिध्दीपत्रक तातडीने प्रसिध्दीस देणे आवश्यक असल्यास शासकीय कार्यालयांनी ते जिल्हा माहिती अधिकारी श्री. बोडके यांच्या 9870934962 या व्हॅटसअप क्रमांकावर पाठवावे. तसेच वृत्तपत्रात प्रसिध्दीस द्यावयाच्या शासकीय जाहिराती प्रसिध्दीच्या दिनांकापूर्वी किमान तीन दिवस अगोदर कार्यालयाच्या ईमेलवर पाठवाव्यात.

अत्यंत महत्वाच्या काम असल्यास या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 0257/2229628 वर संपर्क साधावा. कोरोनाची साखळी खंडित (ब्रेक द चेन) करण्यासाठी सर्व माध्यम प्रतिनिधी, ज्येष्ठ पत्रकारांसह अभ्यागत व शासकीय कार्यालयांनी 30 एप्रिल, 2021 पर्यत सहकार्य करावे. असे आवाहन श्री. बोडके यांनी केले आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज