कापसाच्या मुद्यावरून खडसे कुटुंबात एकमत : रक्षा खडसे म्हणाल्या….

जळगाव लाईव्ह न्यूज । १ जानेवारी २०२३ । राज्याचे दिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूरमध्ये वादळी झाले. . विविध मुद्यांवरुन हे अधिवेशन चर्चेचा विषय ठरल. विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी सरकारवर हल्लाबोल केला.

एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात कापसाचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी कापसाला भाव नाही, भाव द्या. दोन्ही पक्षाच्या एकानेही कापसाचा हा प्रश्न अधिवेशनात लावून धरला असता तर सरकार झुकलं असत. असं खडसे म्हणाले. यातच त्यांच्या सुनबाई खासदार रक्षा खडसे याही कापसाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्या आहेत.

खडसेंच्या या विधानाला रक्षा खडसे यांनी पाठिंबा दिला आहे. त्या माध्यमांशी बोलत होत्या. रक्षा खडसे म्हणाल्या, “यावर्षी कापसाला योग्य भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. मी सरकारची प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारकडे विषय लावून धरेल आणि राज्य सरकारकडेही या संदर्भात बोलणार आहे. कपाशीला भाव कसा वाढवता येईल, यासाठी प्रयत्न करेल,”