कधी नगरसेवक न झालेला हा माणूस आमच्यावर टीका करतोय – गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज। १० फेब्रुवारी २०२३ । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेतील गर्दीबाबत खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत खुर्च्या रिकाम्या असल्याचा आरोप केला होता. याबाबत ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, गर्दी जमवणारे लोक तुम्ही पाठवली आणि आता दुसऱ्यांची गर्दी दाखवून काय उपयोग आहे. तडीपाऱ्या, खून प्रकरणात आम्हाला खोटं अडकवलं गेलं. जेलमध्ये वर्षे वर्षे आम्ही राहिलो आणि आज तुम्ही वल्गना करत आहेत.

ना. गुलाबराव पाटील खासदार संजय राऊत यांच्याबाबत पुढे म्हणाले की, कधी नगरसेवक न झालेला हा माणूस आमच्यावर टीका करतोय. खरं तर उद्धव ठाकरे यांना चुकीचे फिडींग करण्यामध्ये हेच चार-पाच डाकू होते. ‘डाकू’ हा शब्द असंसदीय असल्याने त्याची वाचत्या होईल. पण, याच लोकांमुळे शिवसेनेची ही अवस्था झाली असल्याची घणाघाती टिका ना. गुलाबराव पाटील यांनी केली.