fbpx

ऑक्सिजन अभावी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू ; चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील घटना

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२१ । जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीसोबतच मृत्यूचे तांडव सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोपडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन सिलिंडर बंद पडल्याने ५ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. हे पाचही बाधित ६० ते ६५ या वयोगटातील होते.

रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी आठ जणांची प्रकृती शुक्रवारी रात्री अचानक बिघडली. आठपैकी फक्त तीनच आक्सीजन सिलेंडर  उपलब्ध झाले. उर्वरित पाच जणांना  सिलेंडर न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. दिवसेंदिवस नव्या रुग्णांसह मृताचा आकडा देखील वाढत आहे. मागील काही दिवसापासून जिल्ह्यात १३ ते १५ रुग्णांचा मृत होत आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज