ऐतिहासिक फैजपूर नगरीत उद्यापासून युवारंग महोत्सव

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ फेब्रुवारी २०२३ । ऐतिहासीक फैजपूर नगरीतील धनाजी नाना महाविद्यालयात युवा रंग महोत्सव होत असून महाविद्यालयाने तयारीला वेग दिला आहे. या संदर्भात बुधवारी सुकाणू समितीची बैठक झाली. 9 ते 13 दरम्यान चालणार्‍या महोत्सवात गुरुवारी दुपारी संघांचे आगमन व नोंदणी घनश्याम काशीराम पाटील रंगमंचावर होणार आहे. युवारंगचे उद्घाटन शुक्रवार, 10 फेब्रुवारी सकाळी 9 वाजता प्रसिद्ध सिनेनाट्य कलावंत ओंकार भोजने यांच्याहस्ते होईल. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कुलगुरू डॉ.विजय माहेश्वरी असतील.

यांची विशेष उपस्थिती
विशेष अतिथी म्हणून आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे, माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, उच्च शिक्षण विभाग जळगावचे सहसंचालक संतोष चव्हाण खान्देशी एज्युकेशन सोसायटी जळगाव अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, सोहळ्याचे स्वागताध्यक्ष महाविद्यालयाचे संस्थाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी उपस्थिती असेल. दरम्यान, पारीतोषिक वितरण समारंभाच्या अध्यक्षसानी विद्यापीठाचे प्रकुलगुरु प्रा.डॉ.सोपान इंगळे तर पारीतोषिक वितरणासाठी सिने नाट्य कलावंत गौरव मोरे यांची व माजी खासदार उल्हास पाटील, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पवार यांची उपस्थिती लाभणार आहे.

104 महाविद्यालयांची नोंदणी : 32 समित्यांचे गठण
‘युवारंग’ महोत्सवासाठी विविध प्रकारच्या 32 समित्या कार्यरत करण्यात आल्या आहेत. जळगावसह धुळे व नंदुरबार तिन्ही जिल्ह्यातून 104 महाविद्यालयांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे. त्यात सर्व मिळून एक हजार 568 कलावंत, 383 सहकलावंत, 176 समूह व्यवस्थापक तर 2 हजार 500 विद्यार्थ्यांची उपस्थिती असणार आहे. एकूण 27 कलाप्रकरांच्या सादरीकरणासाठी पाच रंगमंच उभारण्यात आले आहेत. त्या सर्व रंगमंचाना परीसरातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे देण्यात आली आहेत. त्यात सुमितभाई बोंडे, व्ही.डी.फिरके, घनश्याम काशीराम पाटील, वजीर चांदखा तडवी, बाजीराव नाना पाटील देण्यात अशी ती नावे आहेत.

दोन नवीन कलाप्रकारांचा सहभाग
प्रतिभागी स्पर्धकांपैकी प्रथम द्वितीय, तृतीय या क्रमांकाचे पारीतोषिकासह स्पेशल चॅम्पियशिप फिरता चषका सोबतच प्रत्येक जिल्ह्यासाठी उत्तेजनार्थ एक फिरता चषक हे पारीतोषिक यावर्षी देण्यात येणार आहे. पश्चिमात्य व नाट्य संगीत असे दोन नवीन कलाप्रकार यावर्षी समाविष्ट करण्यात आलेले आहे. यजमान महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची राहण्यासह खाण्याची व्यवस्था केल्याचे प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी यांनी कळवले आहे.

यांची होती उपस्थिती
दरम्यान, बुधवारी आयोजित पत्रकार परीषदेत विविध स्पर्धांची नियमावली आणि नियोजन या संदर्भात डॉ.सुनील कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. डॉ.विनोद पाटील यांनी युवा रंग युवकांसाठी समाजासाठी व देशाच्या सांस्कृतिक विकासासाठी किती महत्त्वाचा आहे याचे महत्त्व पटवून दिले. विष्णू भंगाळे यांनी युवा रंगाची सुरुवात आणि आतापर्यंतचा प्रवास या संदर्भात सूचना व माहिती दिली. ‘युवारंग 2023’ सुकाणू समितीचे सदस्य व कावियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव कुलसचिव डॉ.विनोद पाटील, प्राचार्य डॉ.पी.आर.चौधरी, ‘युवारंग 2023’ कार्याध्यक्ष व राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परीषद सदस्य राजेंद्र नन्नवरे, सदस्य वित्त व लेखा अधिकारी एस.आर.गोहिल, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ.सुनील कुलकर्णी, नवनियुक्त अधिसभा सदस्य विष्णू भंगाळे, डॉ.सुनीता पालवे, डॉ.शिवाजी पाटील, स्वप्नाली महाजन, नेहा जोशी तसेच युवारंग 2023 समन्वयक – उपप्राचार्य डॉ.एस.व्ही.जाधव, सहसमन्वयक डॉ.राकेश तळेले, उपप्राचार्य.डॉ.उदय जगताप, उपप्राचार्य डॉ.एन.ए.भंगाळे, उपप्राचार्य प्रा.विलास बोरोले, प्रसिद्धी समिती प्रमुख डॉ.विजय सोनजे, प्रा.उमाकांत पाटील व विद्यार्थी विकास विभाग कबचौउमवि जळगावचे कर्मचारी जगदीश शिवदे, मच्छिंद्र पाटील आदींची उपस्थिती होती.