एरंडोलमध्ये सलग दिवशी चोरी

बातमी शेअर करा

 

 


जळगाव लाईव्ह न्यूज | १३ सप्टेंबर २०२१ | चोरट्यांनी सुट्टीची संधी साधून वृंदावन नगरातील स्वतंञ मायक्रो फायनान्स प्रा.लि. या कार्यालयाचे कुलूप तोडून रोख रक्कम व सँमसंग कंपनीचा मोबाइल असा एकूण १३हजार एकशे ४४ रूपयांचा ऐवज लंपास केला.

या कार्यालयाला रवीवार पर्यंत सलग तीन दिवस सुटी होती, या फायनान्सचे व्यवस्थापक व कर्मचारी १३सप्टें रोजी सोमवारी सकाळी कार्यालय उघडण्यासाठी गेले असता चोरी झाल्याचे त्यांना आढळुन आले.

जुन्या धरणगाव-कासोदा रस्त्यालगतच्या वृंदावन नगरात स्वतंञ मायक्रोफायनान्स लिमीटेड चे कार्यालय आहे.

 

येथील कर्मचारी तीन दिवस कार्यालयास सुटी असल्यामुळे आपल्या मूळ गावी गेले तर कार्यालयाची चावी मँनेजर नितीन सुरवाडे यांच्याकडे होती.

सोमवारी १३सप्टें २०२१ रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास मँनेजर सुरवाडे हे त्यांच्या सहकारी कर्मचार्यांसोबत कार्यालय उघडण्यासाठी गेले असता दरवाजाचे कुलूप तुटलेले,कार्यालयातील कपाट उघडलेले,मधील वस्तू इतस्तत: पडलेल्या दिसून आल्या,कपाटात ठेवलेली ५हजार१४४ रूपयांची रोकड व १सँमसंग कंपनीचा मोबाइल असा ऐवज चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याबाबत एरंडोल पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलिस करीत आहेत.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

- Advertisement -