fbpx

एरंडोल न्यायालयात जागतिक युवक दिवस ऑनलाईन साजरा

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ ऑगस्ट २०२१ । एरंडोल तालुका विधी सेवा समिती आणि  दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक युवक दिवस ओंनलाईन साजरा करण्यात आला.न्यायाधीश विशाल धोंडगे अध्यक्षस्थानी होते.  ऍड ज्ञानेश्वर महाजन,प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही प्रमुख पाहुणे होते.

यावेळी न्यायाधीश विशाल धोंडगे यांनी युवकांनी जागतिक युवक दिवसाचे औचित्य साधून जागृत राहावे असे सांगितले.युवकांनी आयुष्यात योग्य दिशेने आणि योग्य वेगाने प्रवास करावा असे आवाहन केले.युवकांनी सक्षम भारत घडविण्यासाठी तयार राहावे असे सांगितले.प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी रस्ते सुरक्षा आणि तरुण या विषयावर मार्गदर्शन केले.वाहन चालवत असतांना वेगावर नियंत्रण राखून योग्य टी खबरदारी घेवून वाहन चालवावे असे आवाहन केले.अपघात का आणि कसे होतात याबाबत माहिती त्यांनी दिली.वाहतुकीचे नियम,वाहन चालविताना हेल्मेटची गरज,अपघात झाल्यानंतर घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.ऍड .द्न्यानेशाव्र महाजन यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिवन जगावे असे आवाहन केले.युवकांनी समाजकारण,राजकारण आणि अर्थकारण याची माहिती घेवून आयुष्यात याश्स्वीव्हावे असे सांगितले.युवकांनी व्यसनांपासून अलिप्त राहून व्यसनमुक्त समाज निर्मितीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन केले.राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.नरेंद्र तायडे यांनी सूत्रसंचालन केले.सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा.विजय गाढे यांनी आभार मानले.कार्यक्रमात प्राचार्य एन.ए.पाटील,सहाय्यक सरकारी वकील डी,बी.वळवी,वकील संघाचे तालुकाध्यक्ष ऍड .हेमराज चौधरी,तालुका विधी सेवा समितीचे सदस्य ऍड .ए.एम.काळे यांचेसह प्राध्यापक,वकील संघाचे सदस्य व विद्यार्थी ऑनलाईन सहभागी झाले होते.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज