fbpx

एरंडोल कोविड सेंटर व ग्रामीण रूग्णालयात कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची गरज : खा.उन्मेश पाटील

mi-advt

जळगाव लाईव्ह न्यूज । ०८ एप्रिल २०२१ । एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालय व आदिवासी वसतीगृह कोविड सेंटरमध्ये रुग्णांची देखभाल व्यवस्थित केली जात असली तरी येथे हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करावी, कंत्राटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अकरा महिन्यांची ऑर्डर द्यावी जेणेकरून कर्मचाऱ्यांचा तुटवडा भासणार नाही. असे प्रतिपादन खासदार उन्मेश दादा पाटील यांनी एरंडोल येथील कोविड सेंटरला भेट दिल्यानंतर केले. 

दि.६ एप्रिल २०२१ रोजी दुपारी तीन वाजता खासदार उन्मेशदादा पाटील यांनी एरंडोल ग्रामीण रुग्णालय तसेच आदिवासी वस्ती गृहात सूरू असलेले  कोविड सेंटर येथे भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली. याप्रसंगी प्रांताधिकारी विनय गोसावी,तहसीलदार अर्चना खेतमाळीस, वैद्यकीय अधिकारी डॉ. कैलास पाटील, वैद्यकीय अधिकारी डॉ मुकेश चौधरी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज शेख  यांनी आदिवासी वसतीगृह कोवीड सेंटर व ग्रामीण रुग्णालयात  असलेल्या रूग्णांचा आढावा सादर करीत आरोग्य सुविधा उपलब्ध करतांना येणाऱ्या अडचणी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्यासमोर मांडल्यात. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधून एरंडोल येथील आरोग्य यंत्रणेला असलेल्या अडचणी दूर कराव्यात.

व्हेंटिलेटर उपलब्ध करून द्या तसेच हायफ्लोटू यंत्रणा कार्यान्वित करा व कर्मचाऱ्यांची कमतरता भासत असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांना अकरा महिन्याची ऑर्डर द्या यासह विविध विषयात तातडीने जिल्हा आरोग्य विभागाने कार्यवाही करावी अशी सूचना केली. याप्रसंगी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश परदेशी, माजी उपनगराध्यक्ष  नितीन सदाशिव महाजन, नगरसेवक नरेंद्र पाटील,विक्की पहेलवान,भाजप उद्योग आघाडीचे सचिन विसपुते, भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पान पाटील, तालुका सरचिटणीस अमोल जाधव , तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक नितीन पाटील, भाजपा शहराध्यक्ष निलेश परदेशी, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष  प्रशांत महाजन, युवा मोर्चा शहराध्यक्ष आबा चौधरी, युवा मोर्चा तालुका उपाध्यक्ष  कल्पेश पाटील, निखिल सूर्यवंशी, युवा मोर्चा शहर चिटणीस लोकेश महाले,युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष बंटी शेरवानी, पिंटू राजपूत माजी सरपंच रवी आबा जामदेकर ,सामाजिक कार्यकर्ते शेषराव चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आदिवासी वसती गृह कोविड सेंटर , ग्रामीण रूग्णालय  मधील रुग्णांची  वैयक्तिक विचारपूस करीत त्यांना दिलासा दिला. 

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज

munot-kusumba-advt