fbpx

उभ्या कंटेनरमध्ये टँकर घुसला, एक ठार, एक जखमी

जळगाव लाईव्ह न्यूज । १० मे २०२१ । जळगाव  शहरातील अजिंठा चौफुलीजवळ महामार्गालगत उभ्या असलेल्या एका कंटेनरला भरधाव वेगाने जात असलेल्या टँकरने जोरदार धडक दिल्याची घटना रविवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास घडली. अपघातात कंटेनर चालक चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला तर सहकारी गंभीर जखमी झाले आहे.

याबाबत असे की, शहरातील अजिंठा चौफुलीवरील हॉटेल मानस समोरील मोकळ्या जागेवर  सकाळी ६ वाजेच्या सुमारास केमीकलचे ड्रमने भरलेला कंटेनर (क्रमांक एमएच ४६ एच ६४९७) चालक दिलीप मारूती पाखरे रा. पिंपळगव्हाण ता. पाथरी जि. नगर आणि नामदेव भीमराव महाजन रा. धामणगाव ता. आष्ठी जि. बीड हे दोघे पार्कींगला लावत होते. चालक दिलीप पाखरे आणि नामदेव महाजन हे गाडीजवळ उभे होते. ६.२० वाजेच्या सुमारास धुळ्याकडून भुसावळकडे जाणारा टँकर (एमएच ४३ बीपी ५५६९) भरधाव वेगाने येवून उभ्या कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक दिलीप पाखरे हे चाकाखाली आल्याने त्याचा जागीच ठार झाले तर नामदेव महाजन हे गंभीर जखमी झाले. अपघात होता टँकर चालक टँकर सोडून पळ काढला होता. याप्रकरणी नामदेव महाजन यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरूध्द एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा

जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

टेलिग्रामफेसबुकट्विटरइंस्टग्राम युट्युबगुगल न्यूज