उद्धव ठाकरे यांना ‘ग’ खूप नडतो – मंत्री गुलाबराव पाटील

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ जानेवारी २०२३ । अजित पवारांनी आपली चूक सुधारली होती. अरविंद केजरीवालांनी आपली चूक सुधारली. मात्र उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरेंना ग ची बाधा नडली आहे अशी टीका गुलाबराव पाटील यांनी केली. ते जळगावमध्ये बोलत होते. (gualbrao patil attacks uddhav thakre)

ज्यावेळी अजित पवारांनी सकाळीच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. पण ती चूक त्यांनी देखील दुरुस्त केली होती. दिल्लीत देखील अरविंद केजरीवालांचे आमदार फुटून गेले होते. पण त्यानंतर त्यांना पुन्हा पक्षाच्या बाजूने करण्यात त्यांनी यश मिळविले होते. आमचे बंड देखील थंड करणे शक्य होते. मात्र उद्धव ठाकरे यांची असं करण्याची मानसिकताच नव्हती. उद्धव ठाकरे यांना ग खूप नडतो. अशी टीका यावेळी गुलाबराव पाटील यांनी केली.


‘शिवसेनेत फुट पडल्यानंतर शिंदे गट वेगळा झाला. तेव्हा 40 आमदार शिवसेनेतून (ठाकरे गट) वेगळे झाले. त्या 40 पैकी 33 वा आमदार म्हणून मी शिंदे गटात सहभागी झालो. त्यामुळे आपण भगोडे नाहीत त्यांना सांगितल्यानंतर बाहेर पडलो असेही ते म्हणाले.