उद्धव ठाकरे यांची औकात शून्य आहे ; भाजपाच्या “या” नेत्याने केले वादग्रस्त ट्विट

जळगाव लाईव्ह न्यूज | २० फेब्रुवारी २०२३ | उध्दव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे हा बाप होण्याच्या वयात आला आहे. मात्र अजूनही उद्धव ठाकरे हे स्वतःच्या बापाच्या नावावरच जगत आहेत. उद्धव ठाकरे यांची स्वतःची मिळकत आणि अवकात शून्य आहे. असं वादग्रस्त ट्विट भारतीय जनता पक्षाचे नेते अतुल भाटकलकर यांनी केले आहे.

धनुष्यबाण आणि शिवसेना हे दोन्हीही शिंदे यांना मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणावर पत्रकार परिषद घेताना दिसत आहेत. अशावेळी ते विरोधकांवर चांगलेच तोंडसुख घेत आहेत. वेळोवेळी बाळासाहेब ठाकरे यांचा नाव घेऊन विरोधकांना डीवचायचा प्रयत्न करत आहेत.अशावेळी एका पत्रकार परिषदेचा फोटो ट्विट करत अतुल भाटखळकर यांनी वादग्रस्त ट्विट केले आहे.

ट्विट मध्ये भाटखळकर लिहिले आहे की, मुलगा बाप होण्याची वेळ आली तरीही हे महाशय बापाच्या नावावरच जगतात, कारण साठी उलटली तरी स्वतःची मिळकत आणि औकात शून्य आहे.

https://twitter.com/BhatkhalkarA/status/1627315425766944769?s=20